Hot Posts

6/recent/ticker-posts

विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.


























विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

सांगोला...

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रा. डॉ. दिलीप कसबे व प्रा. आबासाहेब इंगवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे होते.
यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. किसन माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. किसन माने म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी आपले संपुर्ण जीवन समर्पित केलेले आहे. दलितांबरोबर दलितेतर म्हणजे शेतकरी, महिला, ओबीसी यांच्या उत्थानासाठी कार्य केले आहे. ते देशातीलच नव्हे तर जगातील महान विभूती आहेत. खऱ्या अर्थाने शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित आशा समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आचरणात आणि कृतीत आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले. यावेळी प्रा. डॉ. पांडुरंग रुपनर, प्रा. आर. एस. गायकवाड, प्रा. डॉ. रघुनाथ फुले, प्रा. बालकृष्ण कोकरे, प्रा. कैलास सगरे, प्रा. सोनाली कसबे, प्रा. संतोष भोसले, प्रा. रावसाहेब गडहिरे, प्रा. सचिन गडहिरे, श्रीम. विमल माने यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रास्ताविक प्रा. धैर्यशील भंडारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुशील रणदिवे यांनी केले तर आभार प्रा. अशोक कांबळे यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments