बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणे हीच १०७ हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली असेल – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या १०७ हुतात्म्यांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी फोर्टमधील हुतात्मा स्मारक जाऊन, पुष्कचक्र अर्पण करुन त्या शहिदांना अभिवादन केले. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणे हीच १०७ हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली असेल अशी इच्छा यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
यादरम्यान हुतात्म्यांच्या कुटुंबातील सदस्य अद्यापपर्यंत दुर्लक्षित असल्याची खंत ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे व्यक्त केली. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांच्या उपसभापती दालनात बैठक घेऊन प्रश्न सोडवली जाईल असे आश्वासन दिले. तसेच बऱ्याच वर्षांपासून हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाचे पोस्ट तिकीट काढण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरच तिकीट काढण्यात येईल अशी ग्वाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जे अनिर्णित प्रश्न असतील त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येईल असेही त्यानी यावेळी सांगितले. मुंबई महापालिकेच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून अहोरात्र सुरू ठेवण्यात येणाऱ्या ज्योती बद्दल व मुंबई महानगरपालिका यांनी केलेल्या एकूण व्यवस्थेबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले.
यावेळी हरिश्चंद्र सावंत, भाऊ सावंत, समीर राणे, एस.के.शेख, रविंद्र कामतेकर, माजी नगरसेवक गणेश सानप, उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर, विपुल शिंदे, सचिन चिखलकर यांच्यासह कार्यकर्ते व हुतात्माच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

0 Comments