पंततप्रधान मोदी यांना जवळा विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट नी दिला मानवंदना
मा.आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांचेकडून अभिनंदन
सांगोला/प्रतिनिधी:::- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजभवन,पुणे येथे आज दि.७ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे पोलीस दलाच्या कार्यक्रमासाठी आज आले असता राज्य सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र यांच्या तर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजण करण्यात अली यावेळी कै सौ.वात्सलदेवी देसाई विद्यालय जवळा प्रशालेच्या एन.सी.सी.कॅडेट व ऑफिसर बी.एस.शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली.
यावेळी लेफ्टनंट कर्नल आर.आर. जाधव, शहीद मेजर कुणल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा गोसावी, मुलगी उमंग गोसावी, नाईक नंदकुमार रंगराल चावरे , सुभेदार संजय कुमार मोहिते उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी एनसीसीचे पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये,सोलापूर येथील ३८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल मनदिप सिंग, अॅडम आॅफिसर ए.पी.भोसले, सुभेदार मेजर सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनीअर अंडर आॅफिसर अमंग रुपेली,ज्युनिअर अंडर आॅफिसर संकेत कदम, ज्युनिअर अंडर आॅफिसर विजयश्री सुरदे, सार्जंट प्रीती जगदाळे, एनसीसी ऑफिसर बाळासाहेब शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
त्याचप्रमाणे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित एनसीसी कॅडेट्स यांच्याशी संवाद साधताना एनसीसीचे राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पस,करिअर याबद्दल माहिती घेऊन मार्गदर्शन केले व सर्व कॅडेट्सना प्रोत्साहित केले.तसेच वीरपत्नी उमा गोसावी,मुलगी उमंग गोसावी यांच्याशीही संवाद साधला. संस्था अध्यक्ष मा.आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी फोन वरून विद्यालयाचे एन.सी.सी. विद्यार्थी व ऑफिसर बाळासाहेब शिंदे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments