शिवमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यास व्हील चेअर बायसिकल भेट
जागतिक अपंग दिनानिमित्त पुणे लष्कर भागातील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने मुन्ना कुमार यादव या गरीब व होतकरू विद्यार्थ्यास व्हील चेअर बायसिकल भेट देण्यात आली . पुणे लष्कर भागातील राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या आवारात हा कार्यक्रम झाला . यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल गोंदकर , महिला अध्यक्षा वैशाली गोंदकर , हेमंत वर्मा , योगेश खरात , नंदू लोखंडे , वेदांत पिल्ले , शैलेश चोपडे , पूनम वर्मा , पूजा खरात , सुनीता कांबळे , ज्योती जाधव व गंगा राठोड आदी मान्यवर उपस्थित होते .
0 Comments