तर उंदीर खातो तक्रार वही... अकलूज येथील स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितला अजब प्रकार ( माळशिरस तहसीलदारांनी दिले चौकशीचे आश्वासन ) - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

तर उंदीर खातो तक्रार वही... अकलूज येथील स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितला अजब प्रकार ( माळशिरस तहसीलदारांनी दिले चौकशीचे आश्वासन )

तर उंदीर खातो तक्रार वही...
अकलूज येथील स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितला अजब प्रकार
 ( माळशिरस तहसीलदारांनी दिले चौकशीचे आश्वासन)



अकलूज( विलास गायकवाड) अकलूज येथे दत्त मंडळ या नावाने चालवले जाणारे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात, चक्क धान्य सोडून  " उंदीर" तक्रार वही खातो म्हणून आम्ही तक्रार वही एका मोबाईल शॉपी मध्ये ठेवली आहे असे अकलेचे तारे तोडणारा अजब प्रकार सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातील चालक जावेद सय्यद व कर्मचारी ज्ञानदेव नलावडे यांनी सांगितला.
                        याचा सविस्तर वृत्तांत असा की अकलूज येथे ताम्हाणे कॉम्प्लेक्स येथील एकाच गाळ्यामध्ये दोन वेगवेगळे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने चालवले जातात. दत्त मंडळ सरकारमान्य स्वस्त दुकान जावेद सय्यद चालवीत आहे तर दुसरे रेडेकर यांचे स्वस्त धान्य दुकान ज्ञानदेव नलावडे कर्मचारी म्हणून काम करीत आहे. यातील दोन्ही दुकानदाराकडे प्रत्येकी चारशे ते साडेचारशे असे प्रत्येकी ग्राहक संख्या आहे तर महिन्याच्या शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये स्वस्त धान्याचे वाटप केले जाते. या महिन्यातील मालाची वाटप दिनांक 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून अवघ्या चार ते पाच दिवसातच गहू संपला म्हणून तांदळाची वाटप सुरू होते. याची माहिती मिळताच दोन्ही दुकानदारांना याबद्दल विचारणा केली असता गहू खराब आहे. म्हणून वाटला नाही तर दुकानात पाहिले असता पाच ते सहा  फक्त तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. सदर दुकानात पारदर्शकता दिसून न आल्यामुळे त्यांना तक्रार वहीची मागणी केली. यावेळी दोन्ही दुकानदारांनी सांगितले की उंदीर तक्रार वही खातो म्हणून एका मोबाईल शॉपी मध्ये ठेवली आहे. चाललेल्या प्रकाराची माहिती तहसीलदार यांना दिली असता, त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले.
                    गोरगरिबांचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा म्हणून शासन गोरगरिबांना अत्यन्त अल्प दारात धान्याचा पुरवठा करीत असतात. साखर, गहू, तांदूळ, डाळ, हे पदार्थ पुरवले जातात.परंतु अनेकदा, अनेकवेळा, अनेकठिकानी स्वत धान्य दुकानातील गैरप्रकार उघड झाले आहेत. गोरगरिबांचा हक्क हिरवणाऱ्या आणि अन्न धान्यापासुन वंचित ठेवणाऱ्या स्वत धान्य दुकान चालकाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे अशी मागणी ग्राहकांतून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages