Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनासह पोलिस यंत्रणाही सज्ज

Image result for ganpati

सोलापूरात विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनासह पोलिस यंत्रणाही सज्ज

सोलापूर (११ सप्टेंबर) - गेल्या १० दिवसांपासून सोलापूरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून उद्या गुरुवारी अनंत चतुर्दर्शी दिवशी विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवाची सांगता होणार असल्याने मनपा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यासाठी सज्ज झाले आहे.
सोलापूरात सिद्धेश्वर तलाव येथे विष्णू व गणपती घाट, छत्रपती संभाजी तलाव, विडी घरकुल येथील विहीर, नीलम नगरातील नवले विहीर, शेळगी पूल परिसरातील विहीर असे एकूण सहा ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली असून याठिकाणी पुरेसे जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहे.
मुख्य मध्यवर्ती, लोकमान्य, पूर्व विभाग, लष्कर विभाग, विजापूर नाका, होटगी रोड, घरकुल असे सात प्रमुख विसर्जन मिरवणुकीमध्ये जवळपास १२०० गणेशोत्सव मंडळ सहभागी होणार असून यासाठी पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
प्रमुख विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील वीजप्रवाह सुरु असलेल्या तारांच्या बंदोबस्तासाठी तसेच खबरदारी म्हणून महावितरणकडूनही योग्य नियोजन करण्यात आले असले तरी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत महावितरणचे कर्मचारी व यंत्रणा उपस्थित राहणार आहे
Reactions

Post a Comment

0 Comments