Hot Posts

6/recent/ticker-posts

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पोलिस ठाण्यात हजेरी

Image result for praniti shinde


शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी सोमवारी सदर बझार पोलिस ठाण्यात हजेरी लावली. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहण्याची तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आज सोमवारी सकाळी सदर बझार पोलिस ठाण्यात आल्या होत्या.

'माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी गोरगरिबांसाठी मी कायद्याच्या चौकटीत राहून लढतच राहीन'. सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतोय, पण आम्ही कोर्टाचा निर्णयाचा आदर करतो. आमची लढाई चालूच राहील असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलय.

 कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी वेळी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती याप्रकरणी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
Reactions

Post a Comment

0 Comments