ब्रेकिंग न्यूज...सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे परिवाराकडून पर्यावरणपूर्वक श्रीगणेशोत्सवाला फासला हरताळ...
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस चे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे तसेच आ.प्रणिती शिंदे यांच्या परिवाराने श्रीगणेश उत्सव मूर्तीचे विसर्जन सोलापूरच्या संभाजी तलावात करताना पर्यावरणाच्या रक्षणालाच जणू हरताळ फासला.परिवारीच्यावतीने प्रतिष्ठापित केलेल्या श्रींची मूर्ती निर्माल्यासह तलावात विसर्जनासाठी दिली.यावेळी उपस्थित असलेल्या उज्वलाताई शिंदे तसेच प्रणिती शिंदे व त्यांच्या नातेवाईकांनी विसर्जनावेळीच्या निर्माल्यामुळे संभाजी तलावातील पाणी दूषित होणार,इथं जलप्रदूषण होणार याचा जराही विचार केला नाही.विशेष म्हणजे निर्माल्य काढून घेण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या पर्यावरणप्रेमी आणि पोलिसांनीदेखील मूर्ती बरोबर निर्माल्य पाण्यात जात आहे याबद्दल आक्षेप घेत शिंदे परिवाराच्या उत्सव मूर्तीच्या गळ्यातील निर्माल्य कडून बाजूला ठेवले नाही.
0 Comments