Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.सिद्धाराम म्हेत्रे आणि भारत भालके यांना भाजप प्रवेश नाकारला ...

Image result for bharat bhalke and siddharam mhetre
आ.सिद्धाराम म्हेत्रे आणि भारत भालके यांना  भाजप प्रवेश नाकारला... 
अक्कलकोटचे काँग्रेसचे आ.सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूर-मंगळवेढ्याच्या काँग्रेसचे आ .भारत भालके या दोघांच्या भाजप प्रवेशाला या पक्षाच्या श्रेष्टींनीं असमर्थता दाखवल्याचे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून दै.कटूसत्यला सांगितले. म्हेत्रेंना भाजपात प्रवेश दिल्यास अक्कलकोट तालुक्यातील पूर्ण भाजपमन विरोधात जाणार आहे, तर भालकेंना प्रवेश दिल्यास आ.प्रशांत परिचारकांना  अडचण होणार आहे त्यातून या दोघांनाही विधानसभेची उमेदवारी देण्याच्या बोलीवर प्रवेश द्यायचा नाही असे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात ठरल्याचेही सांगण्यात आलय,त्यामुळे या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणी वाढल्या आहेत. म्हेत्रे आणि भालके या दोघांच्याच भाजप प्रवेशाबद्दल सर्वात अगोदर पासून चर्चा आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments