सोलापुरात गणेश विसर्जनाच्या निघाल्या मिरवणुका...
१० दिवसांच्या पाहुणचारांनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सोलापुरात मुख्य मध्यवर्ती मंडळांसह अन्य साधारण ४०० हुन अधिक मंडळांच्या मिरवणुका निघाल्या आहेत या मिरवणुका रात्री १२ पर्यंत चालतील. ढोल-ताशा , लेझीम , नाशिक ढोल , टिपऱ्या यामध्ये पारंपरिक पद्धतीने मिरवणुका निघाल्या आहेत सोलापुरात मिरवणुकीच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त आहे.'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ' असा जयघोष आसमंतात निनादत आहे.दरम्यान घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या मंडळींकडून श्री गणरायालाही भावपूर्ण निरोप दिला जात आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन जवळपास दुपारपर्यंत पूर्ण झालं आहे.संभाजी तलाव तसेच विष्णूघाट येथे गणपती विसर्जनासाठी गणेशभक्तकानी गर्दी केली आहे.दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विविध मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.शहरातील मिरवणुकांमध्रे प्रमुख पदाधिकारयांच्या छबी असलेले फलक लावण्यात आले आहेत, यातून डिजिटल बंदीला हरताळ फसला गेला आहे.महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पूजा करून मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे.
0 Comments