Hot Posts

6/recent/ticker-posts

पशुवैद्यकिय दवाखान्याच्या परिसरात रस्तावरच सापाने ठाण मांडल्याने नागरिकांची धांदळ उडाली


Image result for damin snake

पशुवैद्यकिय दवाखान्याच्या परिसरात रस्तावरच सापाने ठाण मांडल्याने नागरिकांची धांदळ उडाली
माढा शहरातील पशुवैद्यकिय दवाखान्याच्या परिसरात रस्तावरच सापाने ठाण मांडल्याने नागरिकांची पुरती धांदळ उडाली.रस्त्याने ये जा करणारे प्रवाशी घाबरुन गेले.अखेर एक तासाच्या धावपळी नंतर
बार्शीतील सर्पमित्र वैभव गौतम बोथरा यानी सापाला पकडला अन् उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बुधवारी सांयकाळी साडे पाच वाजता च्या सुमारास हा प्रकार घडला.
पशुवैद्यकिय दवाखान्याच्या परिसरात असलेल्या कनक किराणा समोर सापाने अचानक ठाण मांडला.यामुळे बाजार पेठेतील व्यापार्यासह ये जा करणारे प्रवाशी घाबरुन गेले होते.साप पाहण्यासाठी बघ्यानी गर्दी तर केलीच शिवाय मोबाईल मधील कॅमेरात घटना कैद केली.गर्दी असल्याचे पाहुन सोलापुर मार्गाहुन चाललेल्या बार्शीतील सर्प मित्र वैभव बोथरा यानी धामन जातीचा सात फुटी साप कुशलतेने पकडला आणि तो निसर्गाच्या सान्निध्यात सोडला.या घटनेने मात्र सर्वांची बोलती बंद झाल्याचे दिसुन आले.बोथरा याचे उपस्थितांनी आभार.
Reactions

Post a Comment

0 Comments