Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा शहरात डेग्यु वर प्रतिबंध घालण्यासाठी नगरपंचायत कडुन फवारणी सुरु


माढा शहरात डेग्यु वर प्रतिबंध घालण्यासाठी नगरपंचायत कडुन फवारणी सुरु


माढा शहरात डेंग्यु सदृश परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने माढा नगरपंचायत च्या वतीने बचावात्मक पावले उचलली आहेत.शुक्रवार दि 13 ऑगस्ट पासुन
नगरपंचायतने शहरात फवारणी सुरु केली आहे.शहरातील क्रांतीनगर भागातुन फाॅगिग मशिन द्वारे
डासावर प्रतिबंध घालण्यासाठी पॅराथान केमिकल ची फवारणी सुरु करण्यात आली आहे.
संतोष प्रतापराव साठे(वय 40),सोहम संतोष साठे(वय17),सुरज संतोष साठे
(तिघे रा.क्रांतीनगर माढा)याना डेग्यु सदृश आजाराची लागण झाली होती.त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने फवारणी सुरु केली आहे.
श्यामराव देवकुळे,प्रभाकर पेठे,बाबुराव कदम,गणेश गायकवाड,साई कांबळे,संदीप पवार हे नगरपंचायतचे कर्मचारी फवारणी करण्याबरोबरच प्रत्येक प्रभागात जाऊन आरोग्याच्या व रोगराई च्या दृष्टी ने उपाय व खबरदारी कशी घ्यायची याबाबत माहिती देत आहेत.शहरातील सर्वच प्रभागात दोन मशिन द्वारे फवारणी केली जाणार असुन शहरवासिंयानी देखील आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे व मुख्याधिकारी चरण कोल्हे यानी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments