मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना जागावाटपाची पहिली फेरी पार..

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये जागावाटपाची पहिली फेरी पार पडली आहे. यावेळी महायुतीतील इतर घटकपक्षांना 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याचाच अर्थ या दोन्ही पक्षांमध्ये 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या आहेत यावर चर्चा होणार आहे. भाजपला 160 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. पण शिवसेना मात्र भाजपला इतक्या जागा देण्यास तयार नाही. तर स्वत:साठी शिवसेनेला 110 पेक्षा कमी जागा अमान्य आहेत. त्यामुळे चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर सध्यातरी भाजप 160, शिवसेना 110 आणि मित्रपक्ष 18 या फॉर्म्युल्याबाबत खलबतं सुरू असल्याचं दिसत आहे. प्राथमिक फेरीत समोर आलेला हा फॉर्म्युला अंतिम नाही. यावर चर्चेच्या आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. त्यानंतर अंतिम जागावाटप ठरणार आहे. या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे उपस्थित होते.
0 Comments