आयशर टेम्पोची पाठीमागून ट्रॅक्टरला धडक,एकाचा जागीच मृत्यू .
सोलापुर: विजयपूर रोड वर हा अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी.हि घटना बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली.विनोद धर्मा पवार (वय 28 रा.गोविंद तांडा कवठे) असे मृत तरुणाचं नाव आहे.
विनोद व त्याचे चार मित्र हे विजयपूर वरून ट्रॅक्टर मध्ये मंडपाचे सामान परत घेऊन सोलापूरला येत असताना, विजयपूर रोडवर झळकी येथे आयशर टेम्पोने पाठीमागून ट्रॅक्टरला येऊन धडकला.धडक जोराची असल्यानं ट्रॅक्टर पलटी होऊन खड्यात पडून विनोद पवार रा.ता.उ.सोलापूर याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आले असून पुढील वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.
विनोद पवार यांच्या पश्चात एक मुलगा, बायको, आई, वडील, भाऊ, वहिनी, असा परिवार आहे.या दुर्दैवी घटनेने गावात दुःखाचे वातावरण आहे.
विनोद पवार यांच्या पश्चात एक मुलगा, बायको, आई, वडील, भाऊ, वहिनी, असा परिवार आहे.या दुर्दैवी घटनेने गावात दुःखाचे वातावरण आहे.
0 Comments