टेंभूर्णीतील हल्लाबोल आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
माढा (प्रतिनिधी)ः शेतकर्यांकडून कसलेही फॉर्म भरून न घेता बँकेचे खाते पाहून सरसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे , संपूर्ण वीज बील माफी, शेतीमालाला हमी भाव, सीना माढा उपसासिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद आणि सीना व भीमा नदीवर बॅरेजेस व्हावेत या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने टेंभूर्णी ता. माढा येथे शनिवार दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन केले असल्याची माहिती माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
ते शुक्रवार दिनांक ६ एप्रिल रोजी पिंपळनेर ता. माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये आयोजित पञकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे, माढ्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील सरकार हे नुसत्या घोषणा व कोरडी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करणारे आहे त्यामुळे या विश्वासघातकी सरकार धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चिञाताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युती शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन होणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, या सरकारने आत्तापर्यंत शेतकरी आणि गोरगरीब व गरजू जनतेची फसवणूक करीत तोंडाला पाने पुसत खुर्ची व सत्ता टिकण्यासाठी धडपड केली आहे. वीज व रस्त्यांच्या समस्या, जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणि वाढते पेट्रोल व डिझेलचे दर यामुळे जनता अक्षरशः ञस्त झाली असून संधी मिळताच ते त्यांचे नक्कीच उत्तर या युती सरकारला देतील असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. याप्रसंगी माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments