Hot Posts

6/recent/ticker-posts

फसव्या आणि लबाड भाजप सरकारचा आज होणार पोलखोल

सुभाष देशमुखच डल्ले मारत फिरतायेत ः पवार 

सांगली ः पालकमंत्री सुभाष देशमुख स्वत:च डल्ले मारत फिरत असून आम्हालाच डल्ल्याची भाषा सांगतात. स्वत: अग्निशमन दलाच्या जागेवर बंगला बांधला. लोकमंगलचे पैसे मध्यंतरी सापडले, त्याचे उत्तर अद्याप दिले नाही अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या टिकेबाबत बोलताना शिवसेनेला गांडुळाची टीका झोंबल्याने त्यांची मळमळ बाहेर आल्याचे पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दौर्‍यावर आलेल्या श्री. पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. परंतू पत्रकार चुकला की त्याला शिक्षा करण्याचा आणि पत्रकारीता रद्द करण्याची भूमिका सरकारने मांडली. परंतू त्याविरोधात आवाज उठल्यानंतर ते ’बॅकफूट’ गेले. आम्ही सत्तेत असताना विरोधकांच्या बैठकीला पोलिसांना पाठवले नाही. परंतू आज या सभागृहात ’एसआयडी’, गुप्तवार्ताचे पोलिस आहेत. आम्ही पत्रकार परिषद बोलवली असताना पोलिस इथे का आले? देशातील जनता हुशार आहे. त्यांच्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर ती मान्य करत नाही. आणीबाणी किंवा त्यानंतरच्या काळात हे स्पष्ट झाले आहे. जनता सर्व न्याहाळत असते वेळ आली की बटण दाबून उत्तर देते.’’
शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हटल्यानंतर त्यांनी केलेल्या टिकेबाबत छेडले असता श्री. पवार म्हणाले, शिवसेनेला गांडूळ म्हटल्यामुळे चांगलेच लागलेले दिसते. त्यामुळे एखाद्याने पोटातले सर्व बाहेर टाकावे, त्याप्रमाणे टीका केली आहे. आम्ही आमची भूमिका मांडली. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता जनता निर्णय घेईल आमचे खरे की त्यांचे.’’ चहा घोटाळ्याच्या आरोपावर सहकारमंत्री देशमुख हे विरोधकांनी देखील चहा पिला असे उत्तर देतात? असे विचारल्यानंतर श्री. पवार म्हणाले, त्यांचे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही चहापानालाच विरोध केला आहे. त्यामुळे चहापानाला गेलो असे ते म्हणत असतील तर फोटोसह पुरावा द्यावा. आमच्यावर डल्ला मारण्याचा आरोप करणारे पालकमंत्री देशमुख हेच डल्ले मारत फिरत आहेत. अग्निशमन दलाच्या जागेवर त्यांनी बंगला बांधला. लोकमंगलचे पैसे मध्यंतरी सापडल्यानंतर त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. तूर घोटाळ्यावर उत्तर दिले नाही. साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. ऊसदराचा प्रश्‍न आहे. स्वस्त धान्य दुकानासाठी साखर घेण्याची घोषणा केली. तरीही साखर का घेत नाही. इथेनॉलबाबत धरसोड धोरण आहे. ३४०० रूपयाची साखर २८०० रूपयानी चालली आहे. शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे त्यांचे धोरण आहे.’’
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात कधीही घडला नाही असा प्रकार म्हणजे उपाध्यक्षांचे पद साडेतीन वर्षे रिकामे ठेवले आहे. आज त्यांचे बहुमत आहे. ती जागा कोणाला द्यायची याचा निर्णय होत नाही. पंधरा वर्षानी त्यांची सत्ता आली आहे, त्यांना सत्ता सोडायची नाही. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. एकेक दिवस ढकलायचा उद्योग सध्या सुरू आहे.’’


वेळीच सुधारा, अन्यथा डोक्यावर घेणारी जनता पायदळी तुडवेल ः धनंजय मुंडे 


मला २०१४ मधील डिसेंबर अधिवेशन आठवतं. इथे जे विरोधी पक्ष जमले आहेत, ते त्या वेळी एकत्रित आले होते. त्या अगोदर राज्या तीन वर्षे दुष्काळ पडलेला होता. डिसेंबरचे विरोधी पक्षाचे पहिले अधिवेशन म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी समावादी, शेकाप यांनी भूमिका मांडली. विरोधी पक्ष म्हणून पहिली माणगी काय ? तर या राज्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले पाहिजे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. त्या नंतर, सलग तीन वर्षे जेवढी अधिवेशने झाली, त्या सर्व अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी सभागृहात महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची व्यथा मांडली. ज्या ज्या वेळी आम्ही शेतकर्‍यांची बाजू मांडत होतो, त्या त्या वेळी समोरच्या बाकावरुन मुख्यमंत्री म्हणत होते, तुम्हालाच शेतकर्‍यांचा कळवळा आहे का? मी पण शेतकरी आहे, मुख्यमंत्र्यांना तुम्ही कोणत्याही बाजूने पहा. ते शेतकरी वाटतात का, हे तुम्हीच सांगा, आज राज्यात सत्तेवर येवून तीन वर्षे गेली. ज्या ज्या वेळी आम्ही विकासाचा मुद्दा उपस्थित केला, त्या  त्या वेळी १५ वर्षे काय केले, असे मुख्यमंत्री विचारत होते. आज मुख्यमंत्र्यांना एकच विचारायचे आहे की तीन वर्षापूर्वी तुमचे सत्तेशी लग्न लागले आहे. तुम्हाला जनकल्याणाचे पोर होत नाही, त्याचा आम्हाला दोष का देता ? कर्जमाफीचा निर्णय होऊनही १५०० शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतायेत याला जबाबदार तुम्ही आहात.
गुजरात निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही गुजरातच्या शेतकर्‍यांना ५०० रुपये बोनस देणार असाल तर, महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांलाही ५०० रुपये बोन दिला पाहिजे, धानालाही एकरी दहा हजार रुपये मदत दिली पाहिजे. आज सरकारला एकच इशारा द्यायचा आहे की, वेळीच सुधारा अन्यथा तीन वर्षापूर्वी ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर  घेतले, तीच जनता पायाखाली तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार  नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments