Hot Posts

6/recent/ticker-posts

महापौर बनशेट्टी यांच्याविरोधात धरणे आंदोलन

सोलापूर (प्रतिनिधी)ः महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याबद्दल असंसदीय भाषेत वक्तव्य करणार्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्याविरोधात मंगळवारी महापालिका कामगार संघटना कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
शनिवारी महापौरांनी आयुक्तांविषयी बोलताना असंसदीय भाषा वापरली होती. याविरोधात मनपा कामगार संघटना कृती समितीने मंगळवारी काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. ठरल्यानुसार मंगळवारी आंदोलनाला सुरुवात झाली. समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, प्रदीप जोशी, चांगदेव सोनवणे यांची यावेळी भाषणे झाली. महापौरांच्या वक्तव्याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. जानराव म्हणाले, चांगल्या अधिकार्यांविरोधात महापौरांनी वापरलेली असंसदीय भाषा अयोग्य आहे. सोलापुरात आलेले चांगले आयएएस अधिकारी जास्त काळ टिकत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे.
अशा अधिकार्यांना पाठबळ  देण्याचे काम काम सर्वांचे आहे.  महापौर या सुसंस्कृत व शिस्तीच्या समजल्या जाणार्या भाजपच्या आहेत. पण त्यांना आयुक्तांविरोधात वक्तव्य करताना याचा विसर पडला आहे.  यावेळी मनपाचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. तुमच्या भावना प्रशासनाला समजल्या असून त्या महापौरांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगत त्यांनी दिवसभराचे कामबंद आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करीत समितीने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात मनपाच्या विविध विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये अजय क्षीरसागर, आबासाहेब क्षीरसागर, शशिकांत शिरसट, जेटीथोर, राहुल कुलकर्णी, सुनील क्षीरसागर आदींचा समावेश होता.
Reactions

Post a Comment

0 Comments