माढा (प्रतिनिधी)ः माढा शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आणि गोरगरीब व गरजूंना मदत करण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या माढा शहर विकास क्लबच्या वतीने मागील १५ दिवसांत विविध शाळांना आर्थिक मदत व सहकार्य करीत व सामाजिक उपक्रम राबवित एक वेगळा ठसा निर्माण करीत सर्वांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
माढा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा नंबर -२ या शाळेस ५०० लीटर पाण्याची टाकी मोफत दिली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा नंबर-१ या शाळेस पाणी फिल्टर घेण्यासाठी ६७५० रूपये दिले आहेत. माढा शहरात कुष्ठरोग्याची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे माढा शहर विकास क्लबच्या माध्यमातून कुष्ठरोग उद्बोधन व जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे नियोजन कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी डॉ. यु.एफ.जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. माढा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाचनालयासाठी ५००० रूपयांची पुस्तके दिली आहेत. हे सर्व उपक्रम माढा शहर विकास क्लबच्या माध्यमातून केले आहेत. या कार्यक्रमासाठी माढा शहर विकास क्लबचे अध्यक्ष शहाजी चवरे,डॉ. विनोद शहा, ’तुला पण बाशिंग बांधायचयं’ या मराठी चित्रपटाचे निर्माते प्रमोद (भैय्या) वेदपाठक, डॉ.अभय लुणावत, डॉ.अशोक मेहता, डॉ. हनुमंत क्षीरसागर, सोमनाथ गोसावी, दिपक जगताप, नितीन वरवडकर,विशाल शिंदे, सचिव प्रितम लाकोळे, मच्छिंद्र मोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

0 Comments