Hot Posts

6/recent/ticker-posts

नूतन आर.टी.ओ दिपाली थोरात हिचा पाटील यांच्या हस्ते सत्कार

माढा (प्रतिनिधी)ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०१७ मधील परीक्षेत देवडी येथील दिपाली सत्यवान थोरात हिची सहाय्यक मोटार वाहन इन्स्पेक्टर वर्ग-२ ( आर.टी.ओ.) पदी निवड झाल्याबद्दल अनगर ता.मोहोळ  ग्रामपंचायतीच्या वतीने माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजनजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनगरचे सरपंच अंकुश गुंड हे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार राजनजी पाटील म्हणाले की, देवडी सारख्या ग्रामीण भागात राहून शिक्षण घेत दिपाली थोरात हिने मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा उच्च गुणवत्ता सिध्द करू शकतात हेच दिपाली थोरात हिच्या उज्ज्वल यशाने अधोरेखित झाले आहे.
याप्रसंगी त्यांनी दिपाली थोरात हिला आवर्जून सांगितले की, आयुष्यात कितीही मोठ्या पदावर पोहोचली तरी आपल्या आईवडिलांना आणि कर्मभूमीला कधीच विसरु नको असा महत्त्वाचा उपदेश केला. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश हमखास मिळते असे प्रतिपादन त्यांनी केले. मुलींना सुद्धा भविष्यात चांगले करिअर करता येते हेच सर्वांनी लक्षात ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या घवघवीत यशाबद्दल दिपाली थोरात हिचे सर्वञ कौतुक आणि अभिनंदन होत असून अनेक ठिकाणी सत्कार व सन्मान केला जात आहे.  या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी आमदार राजनजी पाटील, सरपंच अंकुश गुंड, देवडीचे सरपंच सचिन थोरात, आदर्श शिक्षक सत्यवान थोरात, सर्जेराव थोरात, माजी सरपंच शहाजी गुंड, भागवत शिंदे, परमेश्वर गुंड, धनाजी थोरात, प्रकाश कुलकर्णी, रवी पाचपुंड यांच्यासह अनेक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments