Hot Posts

6/recent/ticker-posts

खेळाला प्रोत्साहनासाठी भरघोस निधी देऊ ः सहकारमंत्री देशमुख

सोलापूर (प्रतिनिधी)ः राज्य शासन खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने सुंदरम नगर  येथे उभारलेल्या जलतरण तलावाचे आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, नगरसेवक संजय काळे, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संगिता जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘ नव्या जलतरण तलावामुळे जुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांची चांगली सोय होईल. या परिसरातील चांगले जलतरणपटू आणि डायव्हिंगपटू घडावेत, यासाठी हा जलतरण तलाव महत्वाचा ठरेल’.सोलापुरातील जलतरण तलावाच्या ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी क्रीडासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या माध्यमातून केल्या जातील, असे सांगितले.यावेळी देशमुख यांच्या हस्ते शिवछत्रपती  पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.         जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी क्रीडा संकुल समितीचे सदस्य पुरणचंद्र पुंजाल, शरण्णाप्पा तोरवी, जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नारायण जाधव, श्रीकांत ढेपे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments