अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील म.प्र.लि. गुड्डद बसवराज महास्वामी सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता पं.स. सभापती सुरेखा काटगांव यांच्या वतीने आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी इंडी तालुक्याचे आमदार पाटील बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, सभापती सुरेखा काटगांव, उपसभापती प्रकाश हिप्परगी, विलास गव्हाणे, डॉ. सुवर्णा मलगोंडा, जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी, आश्पाक बळोरगी, गोकुळ शुगर्सचे व्हा. चेअरमन गोकुळ शिंदे, जि.प. सदस्य स्वाती शटगार, शिलवंती भासगी, अनिता ननवरे, ड.आनंदराव सोनकांबळे, सिद्धार्थ गायकवाड, भौरम्मा पुजारी, सरपंच प्रिया तोडकर, मंगल पाटील, बाबुराव पाटील, भिमा कापसे उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाषिक अथवा राज्याचा भेद कधीच केला नाही. यामुळेच कर्नाटकातील लोक ही आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. आमदार म्हेत्रे यांच्या प्रयत्नामुळेच भीमा नदीत उजनी धरणाचे पाणी सोडण्यात आले असून या पाण्याचा फायदा कर्नाटकातील भीमा नदीकाठच्या गावांना मिळाला आहे. नागरिकांच्या समस्या सोडण्याचे काम आमदार म्हेत्रे हे करत आहेत. प्रांतवादाची भूमिका न घेता जनसेवेची भूमिका घेणारा लोकनेता म्हणून आमदार म्हेत्रे यांच्याकडे पाहिले असे सांगितले.
आमदार प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या, आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहणारे आमदार आहेत. म्हेत्रेंमुळे तालुक्यात कॉंग्रेस पक्ष बळकट आहे. आ. म्हेत्रे यांच्याकडे विकास कामे करण्याची धाडाडी, जिद्द, चिकाटी व धाडसी निर्णय घेण्याचे क्षमता आहे.
याप्रसगी शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील, डॉ. सुवर्णा मलगोंडा, अश्पाक बळोरगी आदींनी मनोगत व्यक्त केले. शेवटी म.नि.प्र. शिवानंद महास्वामी यांचे आर्शिवचनपर मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमात आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया शिबीर, चष्मे वाटप, मोफत औषधे, महिलांना पिको फॉल मशीन, गरजूंना कर्ज वाटप, महिला मेळावा आदी कार्यक्रम सपंन्न झाले..
0 Comments