माढा (प्रतिनिधी)ः सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करणारे आहे त्यामुळे या विश्वासघातकी सरकार धडा शिकवण्यासाठी ७ एप्रिल २०१८ रोजीच्या सकाळी ठीक दहा वाजता टेंभूर्णी ता.माढा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह भैय्या शिंदे व माढ्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे व पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित पूर्व तयारी बैठकीत केले आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार व पक्षाचेअभ्यासू नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युती शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माढा तालुका व विधानसभा मतदारसंघ शिंदे बंधूनी अक्षरशः पिंजून काढला असून गावोगावच्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने हे आंदोलन ऐतिहासिक व अभुतपूर्व होणार असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे.
आत्तापर्यंत शेतकरी आणि गोरगरीब व गरजू जनतेच्या तोंडाला पाने पुसत या सरकारने खुर्ची व सत्ता टिकण्यासाठी धडपड केली आहे. वीज व रस्त्यांच्या समस्या, जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणि वाढते पेट्रोल व डिझेलचे दर यामुळे जनता अक्षरशः ञस्त झाली आहे. विकासकामांच्या नावाने तर सर्वञ बोंबाबोंबच सुरू आहे.सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारने शेतकरी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली आहे. हे युतीचे सरकार शेतक-यांवर व गोरगरीब कष्टकरी जनतेवर अन्याय करीत आहे. कोणत्याही समस्या व प्रश्न या सरकारने सोडविल्या नाहीत उलटपक्षी ज्वलंत प्रश्न तसेच तेवत ठेवण्याचे काम सातत्याने करीत असल्याने जनतेच्या मनात या सरकारविरुद्ध प्रचंड रोष आणि संताप असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह भैय्या शिंदे व सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी गावोगावच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पूर्व तयारी बैठकीत प्रतिपादन केले आहे.
बबनरावजी शिंदे शुगरचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक ४ एप्रिल २०१८ रोजी माढा तालुक्यातील कुर्डु व टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील अनुक्रमे फुटजवळगाव, अकोले (खुर्द), सुर्ली ,शिराळ (टें) ,उजनी (टें) , भिमानगर ,रांझणी ,आलेगाव (बु) ,रुई ,आलेगाव (खु) , चांदज, टाकळी ,वडोली, गारअकोले , आढेगांव,नगोर्ली ,चव्हाणवाडी (टें) व टेंभुर्णी याठिकाणी माजी उपसभापती बंडुनाना ढवळे,भाई शिवाजी पाटील,पंचायत समिती सदस्या ऍड.यशोदाताई ढवळे , विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक बबनबापू पाटील ,वेताळा जाधव ,माढा विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी गावभेट देत मार्गदर्शन केले.
माढ्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार दिनांक ५ एप्रिल रोजी माढा तालुक्यातील मोडनिंब जिल्हा परिषद गटातील अनुक्रमे उजनी, व्हळे, भेंड, अरण, तुळशी, मोडनिंब,वरवडे याठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी, सरपंच अविनाश निकम, डॉ. दळवी, डॉ. पाटील, दिगंबर माळी, डॉ. मोरे यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनास मोठ्या संख्येने येण्यासाठी आवाहन केले.

0 Comments