Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीशैल हत्तुरे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

सोलापूर (प्रतिनिधी)ः श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांना लिंगायत समाजाच्यावतीने भरविण्यात आलेल्या आठव्या बसव महामेळाव्यात खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लातूर येथे लिंगायत समाजाचा ८ वा बसव महामेळावा पार पडला. यामेळाव्यात हत्तुरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, अहमदपूरचे श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज, औसाचे शांतवीर शिवाचार्य, का. सिरसीचे मुर्गराजेंद्र महास्वामी, शिरुरचे शंकरलिंग शिवाचार्य महाराज, देवणीचे श्री. सिध्दलिंग महास्वामी, महात्मा बसवेश्वर चित्रपटाचे निर्माते सुदर्शन बिराजदार आदी उपस्थित होते.
श्रीशैल हत्तुरे यांनी श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो बसव मुर्तींचे वाटप केले आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबीर, अन्नदान योग शिबीर, व्याख्यानमाला, गरजू लोकांना मदत, अपंग व निराधार लोकांना स्वखर्चातून घरेही त्यांनी बांधून दिली आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. .
Reactions

Post a Comment

0 Comments