सोलापूर (प्रतिनिधी)ः राज्यात अग्रेसर असलेल्या ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँके च्या २१ व्या शाखेचा विजापूर रोडवरील ’एसआरपी कॅम्प’ येथे येत्या शनिवारी (ता. ७) सकाळी नऊ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येत आहे. यावेळी आ. प्रणिती शिंदे, आ. सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे व बँके चे मार्गदर्शक तथा माजी आमदार दिलीप माने यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे..
सहकार तपस्वी स्व. ब्रम्हदेवदादा माने यांच्या आशिर्वादाने व माजी आमदार दिलीप माने माने यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हदेवदादा माने बँकेची सध्या यशस्वी वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या उद्योजकांना पतपुरवठा करुन महाराष्ट्राचा आर्थिक कणा मजबूत करण्याचे काम सध्या बँक करीत आहे. महाराष्ट्रात सध्या बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत आहेत. नव्याने २१ व्या शाखेचा शुभारंभ सोलापूरातील ’एसआरपी कॅम्प’ येथे करण्यात येत आहे. बँकेत सध्या पाचशे कोटींहून अधिक ठेवी असून गतवर्षात बँकेच्या ठेवींमध्ये तब्बल १२० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या १ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे बँकेची दमदार वाटचाल सुरु आहे. .या कार्यक्रमास बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व शहरातील नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत लिंबीतोटे व सरव्यवस्थापक शरद शिंदे यांनी केले आहे..

0 Comments