सोलापूर (प्रतिनिधी)ः बिघडलेली कायदा व सुव्यवस्था , वाढत चाललेली महागाई, रोजगाराची समस्या, वाढती बेकारी,उद्योग आणि व्यवसायात प्रचंड घसरण, महिलांची असुरक्षितता, अराजकता यासह शेतक-यांची कर्जमाफी, शेतक-यांच्या आत्महत्या, जनविरोधी व अनागोंदी कारभार याकडे लक्ष वेधण्याबरोबरच फसव्या आणि लबाड भाजप सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्हा- शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने शुक्रवार ६ एप्रिल रोजी महुद सांगोला , मोहोळ आणि सोलापूर येथे तर ७ एप्रिल रोजी टेंभुर्णी माढा , वैराग बार्शी आणि कुर्डुवाडी येथे हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे- पाटील , शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी याबाबतची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार ६ एप्रिल रोजी महूद येथे सकाळी ११.०० वाजता मोहोळ येथे दुपारी ४. ०० वाजता आणि सोलापुरातील नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ६. ०० वाजता तर शनिवार ७ एप्रिल रोजी टेंभुर्णी येथे सकाळी ११ वाजता वैराग येथे सायंकाळी ५ वाजता आणि कुर्डुवाडी येथे रात्री आठ वाजता हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणा-या जाहीर सभेत विधिमंडळाचे गटनेते अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची तोफ धडाडणार असून राज्यातील जनतेची फसवणूक करणा-या लबाड व फसव्या भाजप सरकारची पोलखोल करणार आहेत.
राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा ७/ १२ कोराकरण्यात यावा याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. शेतक-यांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतक-यांच्या कृषी पंपाची वीज बिले तात्काळ माफ करावी, जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, नोटबंदी व जी.एस.टी मुळे उद्योग व माहिती तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रातील रोजगारात मोठी घट झाल्यामुळे बेकारांच्या संख्येत प्रचंड वाढ आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाचे हे परीनाम आहेत. दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार व नोक-या देण्याच्या सरकारच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये अशांतता निर्माण झाली आहे. विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित असून त्यांना शिक्षण शिक्षण घेताना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. नोटबंदीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील पैसे स्वीकारण्यात न आल्यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळकी असून सर्वसामान्यांच्या मनामध्ये सरकार विषयीची विश्व्सार्हता संपली आहे. सरकारने फसव्या व खोट्या जाहिरातींवरील वारेमाफ खर्च थांबवून हा पैसे विकास कामांसाठी उपयोगात आणावा ड़ॉ मागण्यासाठी राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सोलापूर नागरिक पश्चातापाचे बळी
सोलापूरचा विकास व्हावा आणि सोलापूरचे प्रश्न सुटावेत म्हणून सोलापूरकरांनी भाजपला महापालिकेत एक हाती सत्ता दिली. मात्र दोन मंत्र्यांच्या गटबाजीमुळे सोलापूरच्या विकासाला खीळ बसली आहे. निधीअभावी महापालिकेचे व भाजपांतर्गत गटबाजीमुळे शहरवासीयांचे नाहक हाल होत आहे. यंदाचा वर्षाचा अर्थसंकल्प लांबल्यामुळे विकासकामावरही परिणाम झाला आहे. भाजपच्या अनागोंदी कारभारामुळे महापालिका आर्थिक दिवाळखोरीत सापडली आहे. परिवहन खाते दबंगाईला आले असून अनेक महिन्यांपासून पगारी होत नसल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सार्वजनिक आरोग्य व परिवहन हि महत्वाची पदे सोलापूरच्या मंत्र्यांकडे असतानासुद्धा सिव्हिल हॉस्पिटल आणि एस.टी. महामंडळाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. उड्डाण पुलाला शहरवासीयांचा कडाडून विरोध होत असतानासुद्धा अनेकांच्या घरावर सत्तेच्या जोरावर बुलडोझर फिरविण्याच्या हालचाली सुरु आहेत. कामगार राज्यमंत्रीपद सोलापूरला असूनही सोलापुरातील हजारो कामगार हाताला काम मिळत नसल्यामुळे बेकार आहेत. गुळगुळीत रस्त्यावर स्मार्ट सिटीच्या नावाखाली तब्बल २१ कोटी रुपयांचा चुराडा करून दिखावा करण्यात येत आहे. एकूणच स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरवासीयांच्या डोळ्यात चक्क धूळफेक करण्यात येत आहे. गाळे धारकांचा प्रश्न गंभीर बनला असताना हा प्रश्न सोडवून गाळेधारकांना दिलासा देण्याऐवजी गाळ्यांचा लिलाव करून व्यापारी वर्गाला नेस्तनाबूत प्रयत्न सत्ताधा-यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. वेळी-अवेळी येणा-या पाण्यामुळे शहरवासीय हैराण आहेत. अनुदानाअभावी महापालिकेची पूर्ती हेळसांड होत असून रस्ते, वीज आणि कच-याच्या समश्येने सोलापूरकर नागरिक त्रस्त झाले आहेत. एकूणच भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता देऊन सोलापूरकरांना पश्च्याताप झाला आहे. तर दोन मंत्री असून अडचण अन नसून खोळंबा अशी सोलापूरकरांची अवस्था झाल्याचे सांगत भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला बळीराम काका साठे, लतीफ तांबोळी,नगरसेविका सुनीता रोटे, जुबेर बागवान,राजू कुरेशी,विक्रांत माने,राजन जाधव,लता फुटाणे, सिया मुलाणी,महेश निकम्बे, आनंद मुस्तारे, जावेद खैरदी,सुहास कदम,प्रमोद भोसले,प्रशांत बाबर,दिनेश शिंदे,अमीर शेख,तनवीर गुलजार, संजय सरवदे, लक्ष्मण भोसले, शिवराज जाधव, युवराज माने,प्रकाश जाधव, राजेश अच्युगटला,शिवराज विभूते,महंमद इंडिकर आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment