Hot Posts

6/recent/ticker-posts

नरखेड येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा

मोहोळ (प्रतिनिधी)ः मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यात्रेस रविवार, दि. ८ पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सिध्देश्वर मंदिरात ३ कोटी राम नाम जप यज्ञास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही सोमवार, दि. २ एप्रिल पासून रविवार, दि. ८ एप्रिल २०१८ पर्यंत सकाळी ८ ते १० व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री सिध्देश्वर मंदिरात गावातील व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी भाविकांच्यावतीने अन्नदान करण्यात येत आहे. श्री सिध्देश्वर यात्रा कमिटीच्यावतीने रविवार, दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री ची व काटींची मिरवणूक, रात्री ९ वाजता हणमंत काळे लिखित ’गाव लई बाराचं’ हे नाटक सादर केले जाणार आहे. सोमवार, दि. ९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्रींस अभिषेक, सायंकाळी ५ वाजता काटीची मिरवणूक, रात्री ८ वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक व शोभेचे दारूकाम तसेच रात्री १२ वाजता करमणुकीचा कार्यक्रम ’महाराष्ट्राचा लावणी महासंग्राम’ हा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता यात्रेकरूंसाठी झुणका भाकरी, धनगरी ओव्या, भेदी गाणी, दुपारी ३ वाजता नामांकित मल्लांच्या योग्य इनामासहित जंगी कुस्त्या, ६ वाजता बैल, रेड्याच्या टकरी व रात्री ९ वाजता कुंदा पाटील तमाशा मंडळ पुणेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी नरखेडसह परिसरातील भाविक भक्तांनी या धर्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्यावतीने केले आहे.नरखेड येथील श्री सिध्देश्वर मंदिरात मागील दोन वर्षापूर्वी श्री सिध्देश्वर अन्नछत्र मंडळ सुरु केले असून या मंडळाच्यावतीने मंगळवार, दि. १० एप्रिल रोजी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना अन्नदान केले जाणार आहे. दर सोमवारी अन्नदान करण्यात येत आहे..
Reactions

Post a Comment

0 Comments