Hot Posts

6/recent/ticker-posts

कुंभारी सरपंच सिद्धाराम इमडे यांचा भाजपात प्रवेश

सोलापूर (प्रतिनिधी)ः बूथ चलो अभियान दौर्‍यात सहकार मंत्री सुभाष देशमुख कुंभारी येथे गेले असता, त्यांच्या उपस्थितीत कुंभारीचे सरपंच सिद्धाराम इमडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,   तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, रामप्पा चिवडशेट्टी,जि.प.सदस्य आनंद तानवडे, आण्णप्पा बाराचारी, शिरीष पाटील, राम होनराव, शब्बीर जमादार, राजशेखर कोरे, धिरज चप्पेकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनामिनीत्त मुंबई येथे भाजपा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बूथ चलो अभियान राबविले. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दौर्यात कुंभारी येथे सरपंच सिद्धाराम इमडे यांनी भाजपात प्रवेश केला, यावेळी त्यांचा सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले.
   भारतीय जनता पार्टीने आणलेल्या जनकल्यानकारी योजना, दूरदृष्टी व विकासाभिमुख नेतृत्वामुळे वाढती विश्वासार्हता यामुळे भाजपात अन्य पक्षाकडुन प्रवेश वाढत आहे. कोंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कुंभारी सरपंचांचा निर्णय स्वाग्रतार्ह आहे, विकास कामे करण्यासाठी वातावरण अनुकूं होत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यानी समाधान व्यक्त केले.दक्षिण सोलापूर येथे हिपळे, होटगी स्टेशन, यत्नाळ, बरूर, चिंचपूर टाकळी, कुरघोट, कारकल, लवंगी, सादेपूर, निंबर्गी, कंदलगाव,  कुंभारी, तोगराळी, लिंबीचिंचोळी, वळसंग, कर्जाळ उत्तर सोलापूर येथील तेलंगाव सीना, पाथरी, तिर्‍हे, शिवणी, पाकणी व  अक्कलकोट येथे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दौरा करून कार्यकर्त्यांना मुंबई येथील के बी सी मैदानावर होणार्‍या भाजपाच्या महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments