महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी अंकाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी अंकाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी अंकाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. उद्योग, व्यापार, उद्योजकता तसेच ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या विविध विषयांवरील लेखांचा या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात उद्योजकतेची संस्कृती रुजविणे, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’ या संकल्पनेवरही या अंकात विशेष भर देण्यात आला आहे.

यावेळी व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, संपादकीय सल्लागार शिवाजी मानकर, सर कार्यवाहक सुरेश घोरपडे, आणि ॲड. रिचा पाठक, उपस्थित होते. यावेळी चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी ‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. गावागावांत उद्योजक निर्माण व्हावेत, स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामीण युवकांना रोजगाराऐवजी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने या उपक्रमाची आखणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages