ज्ञानेश्वर उर्फ माऊली भोसले यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :-भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
पक्ष संघटनेप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कार्यातील योगदान आणि संघटनात्मक कामाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांना राज्यभरातील अनुसूचित जमाती समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.
या निवडीबद्दल श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली भोसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, हीच अपेक्षा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment