मानेगाव जिल्हा परिषद गटात १ कोटी ४१ लाख २५ हजारांची विकासकामे मंजूर
जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांची माहिती
माढा (कटूसत्य वृत्त):- मानेगाव जिल्हा परिषद गटातील शाळा दुरुस्ती आणि गावपातळीवरील मूलभूत कामांसाठी १ कोटी ४१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यात शाळा दुरुस्तीसाठी ५१ लाख २५ हजार रुपये तर १५ व्या वित्त आयोगांतर्गत ९० लाख रुपयांच्या कामांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी दिली.
जिल्हा परिषद सोलापूरच्या ९ ऑक्टोबर २०२५ च्या यादीनुसार शाळा दुरुस्ती व सुविधांची एकूण ७१ कामे आहेत. मानेगाव गणातील ३२ कामांसाठी २४ लाख ७५ हजार रुपये, तर दारफळ (सीना) गणातील ३९ कामांसाठी २६ लाख ५० हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. यामध्ये शाळा इमारत दुरुस्ती, वीज जोडणी, वॉटर फिल्टर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह दुरुस्ती, हात धुण्याची सुविधा व ऑडिट यांचा समावेश आहे.
मानेगाव गण : मानेगाव ते वाकाव जुना रस्ता (६ लाख), रिधोरे भूमिगत गटारी (४ लाख), तांदूळवाडी येथे गावांतर्गत पाणीपुरवठा सोय (५ लाख) व पाणीपुरवठा/बोअर (२ लाख), अंजनगाव (उमाटे) स्मशानभूमी संरक्षक भिंत/बोअर (२ लाख), वडाचीवाडी येथे गावांतर्गत पाणीपुरवठा/बोअर (२ लाख) व ऑक्सिजन पार्क सुशोभीकरण (४ लाख), केवड येथे मारुती मंदिर ते विक्रम धर्मे घरापर्यंत रस्ता (४ लाख), कापसेवाडी / हटकरवाडी पाणीपुरवठा/बोअर (२ लाख) व महादेव मंदिर ते लटके वस्ती रस्ता (४ लाख), बुद्रकवाडी वाडी व वस्तीवर पाणीपुरवठा/बोअर (२ लाख) व बुद्रकवाडी ते मानेगाव जुना रस्ता (४ लाख), चव्हाणवाडी गावांतर्गत पाणीपुरवठा/बोअर (२ लाख) अशी कामे आहेत.
दारफळ (सीना) गण : वडशिंगे पाणीपुरवठा (३ लाख), निमगाव (माढा) नरसिंह मंदिर परिसरात ब्लॉक (२ लाख) व निमगाव ते माढा रस्ता (३ लाख), दारफळ (सीना) सार्वजनिक शौचालय (५ लाख) व दारफळ ते राहुलनगर रस्ता (४ लाख), उंदरगाव महादेव मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयाकडील गटार (४ लाख), वाकाव पाणीपुरवठा विहिरीतील गाळ काढणे व फोडकाम (५ लाख), खैरेवाडी वाडी व वस्तीवर पाणीपुरवठा/बोअर (२ लाख) व खैरेवाडी ते विठ्ठलवाडी शिव रस्ता (४ लाख), विठ्ठलवाडी भूमिगत गटार (शेंगरवस्ती) (३ लाख), लोंढेवाडी येथे घनकचरा व्यवस्थापन (४ लाख), खैराव भूमिगत गटार (४ लाख) अशी कामे प्रस्तावित आहेत.

No comments:
Post a Comment