सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूर मधील विद्यार्थ्यांची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आयोजित जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल मधील १४ वर्षे वयोगटांमध्ये आर्टिस्टिक वैयक्तिक आरुषी माळी, १४ वर्षे वयोगट आर्टिस्टिक जोडी गायत्री सावंजी व आरुषी माळी, १९ वर्षे वयोगटांमध्ये आर्टिस्टिक वयक्तिक पद्मनाभ बिराजदार, १९ वर्षे वयोगटांमध्ये रिदयामिक जोडी अनुराग माळी व आरव कोंडूभैरी यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक मा. श्री एम एन नवले सर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास करांडे सर, प्राचार्या स्मिता नवले मुख्याध्यापिका स्मिता नायर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मुलांना क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

No comments:
Post a Comment