अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची कारवाई सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची कारवाई सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची कारवाई

 सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती



 

 

      पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने महत्त्वपूर्ण कारवाई सुरु केली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सुनील तेलंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती घेण्यात आली.

 

        मौजे सोनके, (ता. पंढरपूर), येथे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सागर जनार्दन कोळेकर, सचिन मारुती पाटील (खरात), रणजित आजिनाथ कोळेकर आणि महेश गलांडे या सर्व सोनके येथील रहिवाशांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईसाठी पथकप्रमुख पी. बी. सावंत, एस. एस. सांगोलकर, एस. एस. जाधव आणि ए. जी. जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला. घरझडतीदरम्यान आढळून आलेल्या संशयास्पद कागदपत्रांची चौकशी व तपासणी सुरू आहे. या तपासणीतून उपलब्ध होणारे सबळ पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सुनील तेलंगरे यांनी दिली.

 

            पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रारी किंवा माहिती असल्यास तातडीने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक निबंधक सुनील तेलंगरे यांनी केले आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages