उमाबाई श्राविका विद्यालयातील चि. आर्यन दत्तात्रय गरड यांने पुणे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

उमाबाई श्राविका विद्यालयातील चि. आर्यन दत्तात्रय गरड यांने पुणे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले

 उमाबाई श्राविका विद्यालयातील चि. आर्यन दत्तात्रय गरड यांने पुणे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्य  पदक पटकाविले

 पंजाब येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे




आज दिनांक 26 ऑक्टोबर 2026 रोजी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,आहिल्यानगर येथे पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा सचांनलय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने पुणे विभागीय तलवारबाजी स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात उमाबाई श्राविका विद्यालयातील चि.आर्यन दत्तात्रय गरड यांने  वैयक्तीक इपी या प्रकारात कांस्य पदक  पटकावले .

दिनांक 28 ते 30 ऑक्टोंबर 2026 रोजी जालना येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक इपी या प्रकारात चि.आर्यन दत्तात्रय गरड यांने कांस्य पदक पटकावले.

या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, वरिष्ठ दिप्ती शहा, उपमुख्याध्यापिका माधवी खोत, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, उपस्थित शिक्षक,शिक्षिका  याच्या प्रमुख उपस्थित बुके देऊन शुभेच्छा देण्यात आले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले

त्याच्या या यशाबद्दल श्राविका संस्थेचे सचिव श्री यतीन शहा, विश्वस्त करण शहा, विश्वस्त देवई शहा,   यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

या यशस्वी खेळाडूंला प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे व प्रशिक्षक पवन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages