शिवप्रसाद ग्रुपची मुंबईत दमदार भरारी! कळंबोलीत तीन व्यावसायिक फर्म्सचा भव्य शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

शिवप्रसाद ग्रुपची मुंबईत दमदार भरारी! कळंबोलीत तीन व्यावसायिक फर्म्सचा भव्य शुभारंभ

 शिवप्रसाद ग्रुपची मुंबईत दमदार भरारी! कळंबोलीत तीन व्यावसायिक फर्म्सचा भव्य शुभारंभ




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार, डेअरी आणि बांधकाम क्षेत्रात नवा विस्तार; शरद मोरे यांच्या व्यावसायिक वाटचालीचे मान्यवरांकडून कौतुक शिवप्रसाद उद्योग समूहाने आपल्या व्यावसायिक विस्ताराच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबईनजीकच्या कळंबोली येथे तीन व्यावसायिक फर्म्सचा भव्य शुभारंभ केला. एस. पी. जी. मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या द्वितीय शाखेसह शिवप्रसाद डेअरी प्रोडक्ट्स आईस्क्रीम आणि शिवप्रसाद डेव्हलपर्स या तीन उपक्रमांचा शुभारंभ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.श्रीमती राजश्री जगन्नाथ मोरे आणि शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक तथा अध्यक्ष शरद मोरे यांच्या शुभहस्ते, तसेच सिल्की सक्सेना यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
नातेपुते येथून सुरू झालेल्या एस. पी. जी. मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडने आता कळंबोली येथे द्वितीय शाखेच्या माध्यमातून मुंबई परिसरात विस्तार केला आहे. या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना सहकार क्षेत्रातील आर्थिक सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.शिवप्रसाद डेअरी प्रोडक्ट्स आईस्क्रीमच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला मुंबईच्या बाजारपेठेत नवी संधी मिळणार आहे. तर शिवप्रसाद डेव्हलपर्सच्या माध्यमातून बांधकाम आणि विकास क्षेत्रातही समूहाने पाऊल टाकले आहे.मुंबई ही स्वप्नांची नगरी असून याच नगरीत शिवप्रसाद डेव्हलपर्सच्या माध्यमातून विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात करताना विशेष आनंद होत आहे. सहकार, दुग्धव्यवसाय आणि बांधकाम क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे यांनी यावेळी केले.या सोहळ्यास रमेश मोरे, अतुलदादा जाधव, वैभव मोरे, तेजस मोरे, प्रथमेश मोरे, प्रतीक मोरे, मनोज तुपे, बिल्डर सुनील शिंदे, गणेश सत्रे, बिल्डर अजिंक्य मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच राजश्री जगन्नाथ मोरे, ऋतुजाताई मोरे, अश्विनीताई मोरे, प्रियंकाताई मोरे, नीलमताई जाधव यांच्यासह माळशिरस तालुक्यातील सहकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शरद मोरे आणि मोरे कुटुंबीयांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नातेपुतेसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेल्या शिवप्रसाद उद्योग समूहाने मुंबईच्या बाजारपेठेत विस्तार करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल माळशिरस तालुक्यासाठीही अभिमानास्पद मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages