राणा सूर्यवंशींची Y + सुरक्षा काढण्याची मागणी कोणाच्या शिफारशीवर सुरक्षा दिली ?
कथित हल्ला प्रकरणानंतर सुरक्षा मंजुरीवर प्रश्नचिन्ह; सरकारी पोलीस ताफा,
परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि मंजुरीच्या निकषांची चौकशी करण्याची मागणी
बारामती / पुणे (कटूसत्य वृत्त) : उद्योजक राणा सूर्यवंशी यांना पुरविण्यात आलेल्या Y+ दर्जाच्या पोलीस सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. बारामतीतील १८ ऑक्टोबर रोजीच्या कथित हल्ला प्रकरणानंतर त्यांच्या सुरक्षेची आवश्यकता, मंजुरीचा प्रशासकीय आधार आणि या व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित सुरक्षा व्यवस्थेची फेरतपासणी करून, नियमांच्या कसोटीवर तिची आवश्यकता सिद्ध होत नसेल तर सुरक्षा काढून घेण्याची मागणी जोर धरत असल्याने या सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत पोलीस महासंचालक स्तरावर चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही काही माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे.
परजिल्ह्यातील पोलीस कर्मचारी तैनात करण्याची गरज काय ? राणा सूर्यवंशी यांच्या सुरक्षेसाठीविविध ठिकाणांतील पोलीस कर्मचारी तैनात असल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची
नियुक्ती कोणत्या आदेशानुसार करण्यात आली, त्यासाठी संबंधित जिल्ह्यांची परवानगी होती का, तसेच या व्यवस्थेचा प्रशासकीय आणि मनुष्यबळावरील परिणाम काय झाला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या नावाखाली सरकारी मनुष्यबळाचा वापर होत असल्यास त्याबाबत स्पष्ट नियम
आणि उत्तरदायित्व असले पाहिजे. मात्र, नियुक्त्या नियमबाह्य झाल्या असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. कथित हल्ल्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न १८ ऑक्टोबर रोजी बारामती परिसरात सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले. या घटनेच्या वेळी त्यांचे सुरक्षा कर्मचारी नेमके कुठे होते, सुरक्षा वाहनांचा ताफा त्यांच्यासोबत होता का, आणि
सुरक्षा व्यवस्थेतील नियमांचे पालनझाले होते का, याचीही पडताळणी महत्त्वाची आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या तपासात सूर्यवंशी यांनीच हल्ल्याचा कट रचल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. तपासातील निष्कर्ष आणि सुरक्षा
मंजुरीसाठी पूर्वी नोंदवण्यात आलेली कारणे यांचा परस्पर संबंध आहे का, हे स्वतंत्रपणे तपासले पाहिजे. सुरक्षा काढण्याच्या मागणीमागीलसमाज माध्यमातील प्रमुख प्रश्न असे आहेत की, राणा सूर्यवंशी यांना + सुरक्षा देण्याचा निर्णय नेमका कोणी आणि कोणत्या आधारावर घेतला ? त्याच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याबाबत कोणते अधिकृत मूल्यमापन करण्यात आले होते ? सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि एस्कॉर्ट व्यवस्थेला नियमानुसार मंजुरी होती का? बारामतीतील कथित हल्ल्याच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का ? ५. नव्या तपासाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा सुरू ठेवण्याची आवश्यकता पुन्हा तपासण्यात आली आहे का ? ६. सुरक्षा मंजुरी किंवा अंमलबजावणीत अनियमितता आढळल्यास संबंधित निर्णय आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार का ? सुरक्षा ही प्रतिष्ठा नव्हे, तर गरज!Y+ सुरक्षा ही कोणत्याहीव्यक्तीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक नसून संभाव्य धोक्याच्या मूल्यमापनावरआधारित व्यवस्था आहे. त्यामुळे सुरक्षा देण्याचा निर्णय ज्या कारणांवर घेण्यात आला, त्याची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे. संबंधित
व्यक्तीला सुरक्षा सुरू ठेवण्याची वस्तुनिष्ठ गरज नसेल किंवा मंजुरीच्या प्रक्रियेत अनियमितता आढळली, तर नियमानुसार पुनरावलोकन करून योग्य निर्णय घेणे प्रशासनाचे कर्तव्य
आहे. आता प्रश्न एवढाच आहे की, राणा सूर्यवंशी यांना दिलेल्या + सुरक्षेचा संपूर्ण प्रशासकीय तपशील जनतेसमोर येणार का ? सुरक्षा मंजुरी, पोलीस ताफ्याची नियुक्ती आणि कथित हल्ल्याच्या तपासातील निष्कर्ष यांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य स्पष्ट होणार का ? या प्रकरणात कोणालाही दोषी
ठरवण्याऐवजी अधिकृत कागदपत्रे, सुरक्षा मूल्यमापन आणि तपासातील पुराव्यांच्या आधारे निर्णय घेणेआवश्यक आहे. सुरक्षा सुरू ठेवायची की काढून घ्यायची, याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने नियमांनुसार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घ्यावा, हीच जनतेची अपेक्षा.
सुरक्षा कोणत्या आधारावर मंजूर झाली ?
एखाद्या व्यक्तीला Y+ दर्जाची सुरक्षा देताना तिच्या जीविताला असलेला संभाव्य धोका, उपलब्ध गुप्तचर माहिती, संबंधित यंत्रणांचे मूल्यमापन आणि सक्षम प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वाचा असतो. त्यामुळे राणा सूर्यवंशी यांना ही सुरक्षा देताना नेमका कोणता धोका नोंदवण्यात आला होता, सुरक्षा मंजुरी कोणी दिली आणि त्यासाठी कोणते निकष वापरण्यात आले, याची माहिती समोर येणे आवश्यक
आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रस्त्यावर सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षा पुरविण्यात आल्याचेही वृत्तांत नमूद आहे. त्यामुळे त्या घटनेचा सुरक्षा मंजुरीशी नेमका काय संबंध होता आणि त्यानंतरच्या धोक्याच्या मूल्यमापनात कोणते बदल झाले, याची पडताळणी आवश्यक ठरते.
No comments:
Post a Comment