चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

 चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

सिंचन सुविधा असलेल्या पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उच्च उत्पादन क्षमता असलेल्या मका व ज्वारीच्या चारा वाणांच्या बियाण्यांचे वितरण जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा, तसेच संभाव्य चारा टंचाईच्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करता यावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
सिंचन सुविधा असलेल्या पशुपालकांना प्राधान्य
ज्या पशुपालकांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे आणि जे चारा लागवड करण्यास इच्छुक आहेत, अशा सर्व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी पशुपालकांनी विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह तसेच सिंचन सुविधा उपलब्ध असल्याच्या पुराव्यासह संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावा.
अर्ज सादर केल्यानंतर बियाणे उपलब्ध झाल्यावर त्याचा वापर करून पशुपालकांनी चारा लागवड करावी. मका व ज्वारीच्या उच्च उत्पादनक्षम चारा वाणांच्या लागवडीतून चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे.
चारा उत्पादन वाढविण्यासाठी सहभागी व्हा
सोलापूर जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी अधिकाधिक पशुपालकांनी या योजनेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करावी. जिल्ह्यात चारा उत्पादन वाढवून पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपाआयुक्त पशुसंवर्धन डॉ. अनिल तांबे वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages