वाचनातून ज्ञानसमृद्ध व्यक्तिमत्त्व घडते : प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2026

वाचनातून ज्ञानसमृद्ध व्यक्तिमत्त्व घडते : प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे

 वाचनातून ज्ञानसमृद्ध व्यक्तिमत्त्व घडते  : प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे



सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
नातेपुते  (कटूसत्य वृत्त):-येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त ग्रंथप्रदर्शन, प्रकट अभिवाचन आणि जर्नल स्टँडचे उद्घाटन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे होते. यावेळी भूगोल विभागप्रमुख डॉ. बी. टी. निकम, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. उत्तम सावंत आणि ग्रंथपाल प्रा. दिलीप शिंदे उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. ज्ञान हीच सर्वात मोठी संपत्ती असून, ज्ञानामुळे समाजाची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रगती होते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील पुस्तके व नियतकालिकांचे नियमित वाचन करावे आणि वाचनासोबत लेखनाचीही सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. कमल कांबळे यांनी ‘महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांवर प्रकाश टाकत शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले, असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जर्नल स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. सिद्धेश कुलकर्णी (अकरावी कला), साहिल लांडगे, नूतन बागल आणि श्रद्धा भोसले (अकरावी वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला ग्रंथ भेट दिले. विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या साहित्याचे प्रकट अभिवाचन केले. तसेच यानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रा. श्रीकांत पवार, मराठी विभागप्रमुख डॉ. सुनीता सूर्यवंशी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संभाजी बनसोडे, प्रा. पुष्पा सस्ते, प्रा. नितीन देशपांडे, ज्ञानेश्वर बोराटे, नागराज करपे, संध्या सूर्यवंशी, मोनिका देशमाने यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. दिलीप शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पुष्पा सस्ते यांनी केले, तर आभार प्रा. उत्तम सावंत यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages