सोलापूरमध्ये २२ व २३ ऑक्टोबर रोजी ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’चे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2026

सोलापूरमध्ये २२ व २३ ऑक्टोबर रोजी ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’चे आयोजन

 सोलापूरमध्ये २२ व २३ ऑक्टोबर रोजी ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’चे आयोजन

दिवाळीच्या खरेदीसाठी विविध वस्तूंची आकर्षक पर्वणी; ग्राहकांना भेट देण्याचे आवाहन

सोलापूर      (कटूसत्य वृत्त):- श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ संचलित महिला विभागाच्या वतीने ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर आणि शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात भवन, मुरारजी पेठ, सोलापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ग्राहकांसाठी खुले राहणार आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी एकाच छताखाली करता येणार आहे. यामध्ये आकर्षक ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, सोने-चांदीचे दागिने, ड्रेस, साड्या, ड्रेस मटेरियल, तोरण, रांगोळी साहित्य, विविध खाद्यपदार्थ, मुखवास तसेच इतर अनेक वस्तूंचा समावेश असणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच महिला उद्योजकांना आणि व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनाला सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन महिला विभागाच्या अध्यक्षा प्रीती शहा यांनी केले आहे. प्रदर्शनाची माहिती महिला विभागाच्या सचिव अर्पिता बक्षी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages