जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत सावता महाराजांच्या समाधीस्थळी दुग्धाभिषेक; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडे!
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तथा संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवाराच्या वतीने संत सावता महाराज यांचे वंशज ह भ प सावता महाराज वसेकर अमरसिंह शंकर शेंडे प्रभु महाराज माळी यांच्यासह श्रीक्षेत्र अरण येथील संत शिरोमणी सावता महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी भक्तिमय वातावरणात दुग्धाभिषेक करण्यात आला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा देऊन 150 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली लवकरच या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे भुमिपुजन होणार आहे मा ना जयकुमारजी गोरे साहेब यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड जनसेवेचे बळ लाभावे, यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
विशेष म्हणजे, हा दुग्धाभिषेक केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी समर्पित करण्यात आला. राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बळीराजावरील संकट दूर व्हावे, निसर्गाची कृपादृष्टी राहावी, शेतशिवार पुन्हा हिरवेगार व्हावे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबात सुख, समाधान व समृद्धी नांदावी, असा विशेष संकल्प यावेळी करण्यात आला.
काळ्या आईशी इमान राखून संपूर्ण जगाचे पोट भरणारा बळीराजा आज विविध संकटांशी संघर्ष करीत आहे. त्याच्या कष्टाला योग्य फळ मिळावे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता दूर व्हावी आणि महाराष्ट्रातील शेती पुन्हा एकदा समृद्ध व्हावी, यासाठी संत सावता महाराजांच्या चरणी साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी अमरसिंह शेंडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, संत सावता महाराजांनी श्रमालाच भक्ती मानून समाजाला कर्मयोगाचा महान संदेश दिला. त्याच विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आजच्या या पवित्र दिवशी तीर्थक्षेत्र अरण विकासाचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक नेते जयकुमारजी भाऊ गोरे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेची अखंड सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रावरील नैसर्गिक संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत, हाच या दुग्धाभिषेकामागील मुख्य संकल्प असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या भक्तिमय सोहळ्यास
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. आबासाहेब खारे,
श्री.अमोल यादव यांच्यासह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेत्याच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा उत्सव न करता बळीराजाच्या कल्याणासाठी केलेला हा भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला..

No comments:
Post a Comment