दिवाळीनिमित्त विशेष संवाद: पु. ल. कट्टा येथे रंगणार ‘गोष्ट रांगोळीची’ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

दिवाळीनिमित्त विशेष संवाद: पु. ल. कट्टा येथे रंगणार ‘गोष्ट रांगोळीची’

 

दिवाळीनिमित्त विशेष संवाद: पु. ल. कट्टा येथे रंगणार ‘गोष्ट रांगोळीची’




मुंबई (कटूसत्य वृत्त):-  दिवाळीच्या सणात रंगांचे, संस्कृतीचे आणि कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘पु. ल. कट्टा – गोष्ट रांगोळीची’ या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अकादमीच्या कलांगण प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

घरोघरी रेखाटल्या जाणाऱ्या रांगोळीमध्ये दडलेली परंपरा, संस्कृती, इतिहास, पौराणिक व सामाजिक संदर्भ आणि एक कला म्हणून तिचे महत्त्व या सर्व विषयांवर या कार्यक्रमात रंजक संवाद साधला जाणार आहे. या विशेष सत्रात पत्रकार, निवेदिका, लेखिका श्रद्धा मोरे थोरवे आणि भारतीय प्रतीकशास्त्राचे अभ्यासक, रंगशास्त्र चिकित्सक व हस्तकला लेखक डॉ. गजानन शेपाळ हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून रसिकांशी संवाद साधणार आहेत.

रांगोळीच्या रंगांतून संस्कृतीचा सुंदर प्रवास उलगडून दाखवणारी ही मैफल कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून, या कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. कलेचा आनंद आणि विचारांची मेजवानी असलेल्या या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अकादमीतर्फे करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages