शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील- चंद्रकांत पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील- चंद्रकांत पाटील

 शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील- चंद्रकांत पाटील






 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
       मंत्री पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियन तर्फे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते कॉलेज कर्मचारी युनियनने 10 20 30 चा प्रश्न आश्वासन प्रगती योजना यांच्यासह  शिक्षण क्षेत्रातील रकटलेली नोकर भरती व अनुकंपाच्या जागा तातडीने भरण्यास यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली.
 जर मागण्या मान्य न झाल्यास पदवीधर  व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर कुटुंबियासह बहिष्कार घालून मतदानापासून अलिप्त राहण्याचा इशारा दिला होता. परंतु उच्च शिक्षण मंत्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी जाहीर केले.
     यावेळी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद हो टकर,खजिनदार राहुल खराडे,विद्यापीठ सिनेट सदस्य अजित संगवे,भानुदास घंदुरे,शहाजी जाधव,केशव लोंढे,महेश ढेंगळे,संतोष अलकुंटे,संजीव थिटे,दत्तात्रय सुतार,विलास झरेकर,रोहन हावळे,यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages