अकलूज येथील अकलाई देवी मंदिरात सिमोलंघन उत्साहात साजरा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज परीसरात नागरिकांनी विजयादशमी निमित्त एकमेकांना आपट्यांची पान देत दस-याच्या शुभेच्छा दिल्या.ग्रामदेवता अकलाई देवी मंदिरात देवी भक्तांनी आई राजा उदो उदो आई अकलाईचं चांगभलंचा गजर करत सिमोलंघन उत्साहात साजरा केला.तर श्रीराम मंदिरात रावण दहन व अकलाईचे छबीना मिरवणुकीनंतर शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता झाली.
शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने आज विजयादशमी दस-याची सायंकाळची श्री अकलाई देवीची आरती डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाल्यावर अकलाईदेवी मंदिराच्या परिसरात आराधी गोंधळी व भक्तगणांच्या उपस्थितीत देवीच्या छबिन्याची मिरवणुक काढण्यात आली. देवीच्या छबिन्याने मंदिराची प्रदक्षिणा केली डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शस्त्रपुजा करुन अश्वस्वारीने मंदिरास पाच प्रदिक्षणा पुर्ण केली.श्रीराम मंदिरात शमी झाडाच्या पुजानंतर सिमोलंघन करीत रावणाचे दहन केले.अकलाई देवीच्या छबीना मिरवणुकीनंतर रात्री अकलाई देवी मंदिरात निद्रावस्थेत जाऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी माणिक मिसाळ,अण्णासाहेब शिंदे,दिपक पिंजारे,राहूल जाधव,दादा नामदास,संदिप कोकाटे,विकास शिंदे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment