रूपाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त नऊ दिवस मोफत आरोग्य शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

रूपाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त नऊ दिवस मोफत आरोग्य शिबिर

 रूपाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त नऊ दिवस मोफत आरोग्य शिबिर



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून श्री रूपाभवानी देवस्थान येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नऊ दिवसांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना आणि शासकीय आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शिबिराचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने आणि रूपाभवानी मंदिर समिती ट्रस्टचे अध्यक्ष मल्लिनाथ मसरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर होते.

यावेळी बोलताना डॉ. राखी माने यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. महिलांचे आरोग्य जपण्याचे काम सामाजिक संस्थांकडून होणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. येळेगावकर यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

शिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन, रक्तशर्करा, रक्तदाब आणि एचआयव्ही तपासणी, औषधोपचार, सॅनिटरी नॅपकिन व कुटुंबनियोजन साधनांचे वाटप, माता-बालक लसीकरण तसेच प्रजनन आरोग्यविषयक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. इच्छुक रक्तदात्यांकडून रक्तसंकलनही केले जाणार आहे.

यावेळी विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना आणि मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यंकटेश कंची यांनी स्वागत, डॉ. नागनाथ जिद्दीमनी यांनी प्रास्ताविक, सुगतरत्न गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. श्रुती मराठे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages