पोलीस तणाव मुक्ती अभियान:आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद योग शिबिराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

पोलीस तणाव मुक्ती अभियान:आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद योग शिबिराचे आयोजन

 पोलीस तणाव मुक्ती अभियान:आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद योग शिबिराचे आयोजन



   
अकलूज (कटूसत्य वृत्त):- कायदा व सुव्यवस्था राखण्याची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना, पोलिसांना मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. गुन्हेगारांशी सामना करताना ज्या धैर्याने आणि तत्परतेने पोलीस काम करतात.त्याच ताकदीने त्यांना मानसिक तणावावर मात करता यावी या उद्देशाने शांतीदूत सद्गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रेरणेने व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज परिवाराच्या वतीने पोलिसांसाठी तणावमुक्ती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
        पाच दिवसीय 'आनंद अनुभूती' (आनंदी जीवन जगण्याची कला) या शिबिरामध्ये पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या विशेष शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक प्रा.धनंजय देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये मन शांत कसे ठेवावे.नात्यांमध्ये सुसंवाद कसा साधावा आणि सकारात्मक ऊर्जेने जीवन कसे जगावे.याचे अमूल्य धडे या शिबिरात देण्यात आले.शिबिराचे मुख्य आकर्षण असलेल्या 'सुदर्शन क्रिया' या श्वसन प्रक्रियेचा अनुभव साधकांनी घेतला.या क्रियेमुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन एक वेगळीच ऊर्जा आणि मानसिक शांतता लाभल्याची भावना अनेक साधकांनी व्यक्त केली.या सोबतच शिबिरात विविध प्रकारचे प्राणायाम,ध्यान,योगासने आणि जीवन जगण्याचे सोपे नियम अतिशय सोप्या भाषेत शिकवण्यात आले.
           उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलताना प्रा.धनंजय देशमुख यांनी सांगितले की, "आनंद हा आपल्या आतच असतो.फक्त तो अनुभवण्याची कला आपल्याला अवगत करावी लागते. सुदर्शन क्रिया आणि ध्यानाच्या नियमित सरावाने आपण दररोज तणावमुक्त आणि आनंदी आयुष्य जगू शकतो."
शिबिराच्या यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक अतुल माने,प्रमोद लंबटकर,स्वानंद भागवत तसेच पोलीस स्टेशनचे बबलू गाडे,शिवकुमार मदभावे यांनी अथक परिश्रम घेतले. प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद आणि समाधान दिसून येत होते.

चौकट
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी योग आणि विपश्यना हे केवळ शारीरिक व्यायाम किंवा ध्यानाचे प्रकार नसून,मानसिक स्थैर्य,भावनांवर नियंत्रण,निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त साधने आहेत.पोलिसांना दररोज तणावपूर्ण परिस्थिती, गुन्हेगारी तपास,कायदा व सुव्यवस्थेची आव्हाने आणि नागरिकांच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.“त्यासाठी योग व ध्यान धारणा आवश्यक आहे.”

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages