शिक्षणामुळे माळशिरस तालुक्याचा विकास- डॉ रणधीर शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 28, 2026

शिक्षणामुळे माळशिरस तालुक्याचा विकास- डॉ रणधीर शिंदे

शिक्षणामुळे माळशिरस तालुक्याचा विकास- डॉ रणधीर शिंदे



अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस   तालुक्यात ऐतिहासिक पाऊलखुणा दिसून येतात. अनेक दिग्गज लेखकांनी या तालुक्याचा इतिहास रेखाटला आहे. ऐतिहासिक पाश्वभूमी असलेल्या या तालुक्याचा विकास केवळ चांगल्या शैक्षणिक संस्था व शिक्षण संस्था चालक यांच्यामुळे झाला असे मत कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले.
शंकरनगर - अकलूज येथील उदय सभागृहात रोहित देशमुख लिखित व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशीत "तीन तेरा" या कादंबरीचे प्रकाशन श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे संचालक विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.
प्रारंभी लेखक रोहित देशमुख यांनी आपल्या जडण घडणीत मोहिते पाटील परिवाराचा मोठा हात असल्याचे सांगून सध्याची शिक्षण पद्धती व शासनाचे शिक्षकांविषयी असलेले उदासीन धोरण यामुळे चांगले विद्यार्थी घडविणे कठीण झाले असल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांचा पाया भक्कम झाला नाही तर इमारत कशी उभारणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

न्यू ईरा प्रकाशनचे शरद तांदळे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहाय्यक संपादक डॉ दत्ता घोलप, सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ केदार काळवणे यांनी शिक्षण संस्था, शिक्षण पद्धतीतील बदल व देश घडविण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज याविषयी आपली मते मांडली. जेव्हा शिक्षक शिक्षक राहत नाही त्याचा ऑल इन वन कर्मचारी होतो तेव्हा शिक्षकांच्या नशिबी येणारी ससेहोलपट नेमकी काय असते यावर परखड भाष्य करणारी ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले.

या कादंबरी प्रकाशन सोहळ्यास माजी जि प सदस्य सतिशरावं माने देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील, प्रा हरिभाऊ मगर, सूर्यकांत भिसे, प्रा विष्णू सुर्वे, डॉ विश्वनाथ आवड, डॉ बाळासाहेब मुळीक, संचालक अनिल जाधव, डॉ रामदासी यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages