कबड्डी स्पर्धेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

कबड्डी स्पर्धेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे यश

 कबड्डी स्पर्धेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे यश





नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत सोनी महाविद्यालय, सोलापूर येथे दि. ६ व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाच्या मुली व मुलांच्या संघांनी घवघवीत यश संपादन केले. मुलींच्या संघाने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालक डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालिका सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील व प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे म्हणाले, “खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो. मुलींच्या संघाने सलग चार वर्षे मिळविलेले यश अभिमानास्पद असून, मुलांच्या संघाची कामगिरीही कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अशीच प्रगती करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे.”
खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतेश पाटील, प्रा. नारायण माने व वरिष्ठ लिपिक सूर्यकांत सालगुडे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages