पदवीधरांचा सन्मान आणि रोजगाराचा ध्यास; हर्षदा देशमुख जाधव यांचे पदवीधरांना आवाहन
पुणे (कटूसत्य वृत्त) :- पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख जाधव यांनी पदवीधर मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. पदवीधरांचा सन्मान, तरुणांना रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आजच्या काळात उच्चशिक्षित तरुणांसमोर रोजगार, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकतेसह अनेक आव्हाने आहेत. या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे हर्षदा देशमुख जाधव यांनी म्हटले आहे. पदवीधरांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासोबतच युवकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पदवीला मान, कौशल्याला स्थान, महिलांना सन्मान’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून पदवीधरांच्या अपेक्षा आणि समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी पदवीधर मतदारांनी आपले मोलाचे सहकार्य, आशीर्वाद आणि मार्गदर्शन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
२३ ऑक्टोबरला मतदानाचे आवाहन
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असल्याचे उमेदवारांच्या आवाहनात नमूद करण्यात आले आहे. मतपत्रिकेवरील अनुक्रमांक ३ समोरील रकान्यात पसंती क्रमांक १ नोंदवून आपल्याला विजयी करावे, अशी विनंती सौ. हर्षदा देशमुख जाधव यांनी पदवीधर मतदारांना केली आहे.
पदवीधरांचे प्रश्न, तरुणांचे भविष्य आणि महिलांच्या सन्मानासाठी काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment