प्रभाग २२ मध्ये किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रचाराचा धडाका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

प्रभाग २२ मध्ये किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रचाराचा धडाका

 प्रभाग २२ मध्ये किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रचाराचा धडाका




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे नगरसेवक किसन भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग आला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधत भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारासाठी प्रभागात नियोजनबद्ध पद्धतीने जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन दोन्ही उमेदवारांची भूमिका, कार्य आणि महायुतीची विकासाभिमुख विचारधारा मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे युवा आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप कार्यकर्ते पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय झाले आहेत. मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांची एकजूट आणि वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचा विश्वास नगरसेवक किसन भाऊ जाधव यांनी व्यक्त केला. या प्रचार मोहिमेत नगरसेविका अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड, नगरसेविका चैत्रालीताई शिवराज गायकवाड, माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, राजू ब्रदर जाधव, सुनील कांबळे, युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, सुहास जाधव, संतोष जाधव, अमोल सरवळे, राहुल शिंदे, अभिजीत कदम, शिरीष गायकवाड, श्रीकांत गिड्डे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी सातत्याने संपर्क साधत दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार अधिक गतिमान झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages