माढा लोकसभा मतदारसंघात भूजल पुनर्भरणासाठी व्यापक आराखडा तयार करा - खा. धैर्यशील मोहिते-पाटील
यासंदर्भात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज जिल्हाधिकारी सोलापूर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
माढा लोकसभा मतदारसंघातील संबंधित तालुके, गावे व पाणलोट क्षेत्रांचे सर्वेक्षण करून भूजल पातळी कमी असलेले व पाणीटंचाईग्रस्त भाग निश्चित करावेत, तसेच भूजल सर्वेक्षणाच्या आधारे योग्य ठिकाणी ARF (Artificial Recharge) स्पॉट व रिचार्ज पॉइंट निश्चित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यासाठी रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज विहिरी, परकोलेशन टँक, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, गॅबियन बंधारे यांसह आवश्यक जलसंधारण कामांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच अस्तित्वातील तलाव, पाझर तलाव व बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांची भूजल पुनर्भरण क्षमता वाढविण्यावर भर देण्यात यावा.
प्रत्येक कामासाठी GPS लोकेशन, अंदाजित खर्च, संभाव्य भूजल पुनर्भरण क्षमता, लाभक्षेत्र व लाभार्थी शेतकरी यांची माहिती संकलित करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करण्याच्या शक्यता तपासाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघासाठी तालुकानिहाय व गावनिहाय ARF स्पॉट, रिचार्ज पॉइंट, प्रस्तावित कामे आणि आवश्यक निधीचा समावेश असलेला सविस्तर DPR तयार करावा अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
.png)
No comments:
Post a Comment