शक्तिदेवीच्या‎ घटस्थापना‎ पूजेसाठी पालकमंत्री गोरे‎ यांना‎ नगरसेवकांचे संयुक्त‎ निमंत्रण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

शक्तिदेवीच्या‎ घटस्थापना‎ पूजेसाठी पालकमंत्री गोरे‎ यांना‎ नगरसेवकांचे संयुक्त‎ निमंत्रण

 शक्तिदेवीच्या‎ घटस्थापना‎ पूजेसाठी पालकमंत्री गोरे‎ यांना‎ नगरसेवकांचे संयुक्त‎ निमंत्रण





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-‎ मुंबई, रत्नागिरी, कोकण आणि पुणे परिसरात‎ गणेशोत्सव ज्या‎ उत्साहाने‎ आणि‎ भक्तिभावाने साजरा‎ केला‎ जातो,‎ त्याच‎ धर्तीवर‎ शारदीय नवरात्र महोत्सवाच्या‎ माध्यमातून शक्तिदेवीचा‎ जागर‎ अवघ्या महाराष्ट्रात सोलापूरमध्ये विशेषत्वाने पाहायला मिळतो.‎ सोलापूरच्या‎ या भक्तिमय आणि पारंपरिक नवरात्र‎ महोत्सवाची‎ सुरुवात घटस्थापनेपासून‎ होत असून, या‎ निमित्ताने‎ शक्ती‎ देवीचे‎ प्राणप्रतिष्ठापना‎ मिरवणुकीस‎ तसेच पूजेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री‎ तथा‎ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी‎ उपस्थित‎ राहावे, यासाठी भाजप‎ नगरसेवक‎ किसन जाधव, विनोद भोसले‎ आणि बिजू‎ प्रधाने‎ यांनी त्यांची‎ पुणे विभागीय कार्यालय‎ येथे‎ सोमवारी संयुक्तरीत्या‎ भेट घेऊन निमंत्रण‎ दिले.‎ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई‎ तुळजाभवानीच्या‎ दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रासह परराज्यांतून‎ लाखो भाविक सोलापूरमार्गे तुळजापूरकडे जातात. तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्तही‎ मोठ्या संख्येने‎ भाविक अनवाणी पायी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी‎ मार्गक्रमण‎ करतात.‎ त्यामुळे सोलापूरचा‎ शारदीय‎ नवरात्र‎ महोत्सव हा केवळ धार्मिक‎ उत्सव‎ न‎ राहता शक्ती,‎ श्रद्धा आणि‎ भक्तीच्या‎ जागराचे प्रमुख‎ केंद्र‎ ठरतो. या पार्श्वभूमीवर‎ घटस्थापनेच्या दिवशी‎ पालकमंत्री‎ गोरे यांनी‎ उपस्थित‎ राहून शक्तिदेवीच्या पूजेत‎ सहभागी व्हावे, अशी विनंती‎ नगरसेवकांनी केली. या‎ निमंत्रणाचा‎ स्वीकार‎ करत पालकमंत्री‎ गोरे यांनी‎ सोलापुरातील‎ शारदीय‎ नवरात्र महोत्सवाच्या‎ निमित्ताने‎ उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. दरम्यान, पुणे‎ विभाग‎ शिक्षक‎ मतदारसंघाचे भाजपचे‎ अधिकृत उमेदवार कौस्तुभ‎ मुरलीधर गावडे‎ यांचीही किसन जाधव,‎ विनोद भोसले‎ आणि बिजू‎ प्रधाने यांनी भेट‎ घेतली.‎ आगामी निवडणुकीसाठी‎ त्यांना शुभेच्छा‎ देत‎ विजयासाठी‎ सदिच्छा व्यक्त‎ करण्यात‎ आली. मोठ्या मताधिक्याने‎ विजयी व्हावे, अशा‎ शुभेच्छाही‎ यावेळी‎ नगरसेवकांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages